किसान क्रेडिट कार्डधारक शेतकऱ्यांच्या शेतकरी अपघात विमा बँकेने मा.कार्यकारी समिती सभा दिनांक 31/7/2023 ठराव नं.8 अन्वये वय वर्षे 18 ते 85 वर्षापर्यंतच्या
285880 शेतकऱ्यांचा बँकेच्या स्वनिधीतून अपघात विमा उतरविला आहे. यामध्ये सर्पदंश,वीज पडणे,झाडावरुन
पडणे,वाहन अपघात व पाण्यात बुडणे इत्यादी अपघाती कारणाचा समावेश आहे. याअनुषंगाने इफको-टोकिओ जनरल
इन्शुरन्स कंपनी लि., यांची निवड करणेत आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत प्रति शेतकरी रु.2.00 लाखाचा विमा संरक्षण
असून योजनेचा कालावधी दि.21/8/2023 ते दि.20/8/2024 असा आहे.
प्राथमिक शेती संस्थांनी त्यांचे विमाधारक सभासदांचा अपघात झालेनंतर त्यांचे वारसांनी दावा दाखल
करणेकरिता खालील प्रमाणे कार्यवाही व आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
दावा सादर करणेपूर्वी अपघाताची घटना घडलेचे नंतर 7 दिवसाचे आत कंपनीस कळविणे आवश्यक.
दावा दाखल करणेकरिता विकास सेवा संस्था पत्र, बँक निरीक्षक पत्र घेवून कंपनीचे कार्यालयाशी संपर्क
करावा. त्यानंतर कंपनीकडून क्लेम फॉर्म देणेत येईल.
सुस्पष्ट व योग्यरित्या भरलेला कंपनीचा दावा फॉर्म ज्यामध्ये अपघात झाला होता त्याचे वर्णन व
परिस्थीती स्पष्टपणे नमूद करावी.
मृत्यू प्रमाणपत्र / दाखला (Death Certificate )
शवविच्छेदन अहवाल (Post mortem report )
सार्वजनिक ठिकाणी अपघात झालेस पोलिस FIR प्रत , पंचनामा व ड्रायव्हिंग लायसन्स छायांकित
प्रत.(वाहन अपघाताचे बाबतीत )
घटनेच्या वेळी दावेदार मादक पदार्थाचे सेवन केले नसलेबाबत डॉक्टरांचा अहवाल.
औषधासाठी वैद्यकीय प्रिस्क्रिपशन आणि कॅश मेमो आणि मुळ रुग्णालयात लागणारे शुल्क.
कायदेशीर वारस पत्र योग्य प्रमाणित केलेले.
वारसाचे आधार कार्ड व पॅन कार्ड छायांकित प्रत.
विकास संस्थेकडील मयताच्या कर्ज खात्याचा उतारा.
पोस्टमार्टम अहवालानुसार व्हिसेरा / रक्त संरक्षित केले असल्यास तपासणी अहवाल.
वारसाचे ना हरकत प्रमाणपत्र,विमा रक्कम जमा करणेकरिता बँक खाते क्रमांक व त्याचा तपशील.
MLC पहिला सल्ला पत्र, इनडोअर केस पेपर (अपघाताची तारीख व मृत्यू तारीख यामध्ये अंतर असल्यास
)
अपघाताचे बाबतीत कंपनीस आवश्यक इतर सर्व कागदपत्रे.
अपघाती मृत्यू ( Accidental Death ) संपूर्ण आणि स्थायी अशा स्वरुपाची विकलांगता / दिव्यांगता (
Permanent total disablement ) व स्थायी स्वरुपाची अंशत: विकलांगता ( Permanent total disablement
PPD ) बाबत IFFCO-TOKIO GIC कंपनीच्या मूळ पॉलीशीमधील नमूद कारणासाठी विमा क्लेम मंजूर करणेत येईल.
याबाबत खालील कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधणेचा आहे.
कंपनीचे तालूका प्रतिनिधी व त्यांचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे
क्लेम ऑफिसर : श्री.स्वप्नील सुतार, मोबाईल क्र.9922497823