► आर्थिक समावेशिकरण व व्यवसाय वाढीचा उद्देश डोळयासमोर ठेवून बिझनेस करस्पॉण्डट् (व्यवसाय प्रतिनिधी) यांचे मार्फत ही सुविधा दिली जाते. ► विकास सेवा संस्था व दूध संस्थांचे प्रतिनिधी यांचे मार्फत ही सेवा सद्या सुरु आहे. ► जिथे बँकेची शाखा नाही अशा गावांत, वाडया-वस्त्या व दुर्बल घटक यांना ही सुविधा बँकेने उपलब्ध् करुन दिली आहे. ► ग्राहकांच्या वेळेची बचत करणे व जास्तीत जास्त् ग्राहकांना सेवा देणे. ► व्यवसाय प्रतिनिधी (BC) मार्फत जनरल सेव्हींग खाते उघडणे. ► आर्थिक समावेशिकरणांतर्गत झिरो बॅलन्स् सेव्हींग खाते उघडणे. ► जनधन योजने अंतर्गत असलेले झिरो बॅलन्स् सेव्हींग ठेव खाते उघडणे. ► विद्यार्थ्यांचे शिष्यवृती करीता सेव्हींग खाते उघडणे. ► नॉर्मल व्यक्ती चालू ठेव खाते उघडणे. ► ATM साठी ग्रीन पीन जनरेट करणे. ► ग्राहकांना व्यवहाराकरीता रक्कम् खातेवर जमा करणेची मर्यादा कमीत कमी रु.100/- व जास्तीत जास्त् रु.20000/- पर्यंत. ► ग्राहकांसाठी पैसे काढण्याची मर्यादा कमीत कमी रु.100/- जास्तीत जास्त् रु.10000/- पर्यंत. ► पैसे भरणे व काढणेची वेळ सकाळी 7.00 वाजले पासून रात्री 10.00 वाजेपर्यंत आहे. ► शाखा पातळीवर मायक्रो एटीएम मशिनवर ग्राहकांना पैसे काढणेच्या रक्कमेस कोणतीही मर्यादा नाही. ► सध्या बँकेने 172 व्यवसाय प्रतिनिधींना मायक्रो एटीएम दिले असून त्यामार्फत सुविधा सुरु आहे.
विमा योजना :-
► बँकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होणेच्या दृष्टीने बँकेने रेफरल तत्वावर IRDA ने मान्यता दिलेल्या आयसीआयसीआय लोबार्ड जनरल इन्शुरन्स् कंपनी मार्फत सर्व साधारण विमा करणेचे काम सुरु आहे. ► केअर हेल्थ् इन्शुरन्स् लि, या कंपनीमार्फत व्यक्तीगत कर्ज पुरवठा विभागामार्फत वाटप झालेल्या कर्जदार व सहकर्जदार यांचा कर्जाइतपत विमा उतरविला जातो. ► बँकेमार्फत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. ► प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योनजे अंतर्गत 16141 व्यक्तींपैकी 18 विमा धारकांना प्रत्येकी रु.2.00 लाखाप्रमाणे एकूण रु.36.00 लाखांचा लाभ दिला आहे. ► प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत 46230 व्यक्तींपैकी 5 विमाधारकांना प्रत्येकी रु.2.00 लाखाप्रमाणे एकूण रु.10.00 लाखांचा लाभ दिला आहे.
मोबाईल बँकिंग :-
► बँकेच्या सर्व ग्राहकांना त्यांचे बचत खातेवरील व्यवहार घर बसल्या करता यावेत म्हणून बँकेने मोबाईल ॲप (KDCC MOBILE BANK) ची सुविधा उपलब्ध् केलेली आहे. ► या ॲपद्वारे बँकेकडे असणाऱ्या आठ लाखापेक्षा अधिक ग्राहकांना शाखेत न येता डिजीटल व्यवहार करता येणार आहेत. ► सध्या बँकेचे 46000 ग्राहक या मोबाईल ॲपचा वापर करतात. ► सदर ॲपद्वारे ग्राहकांना IMPS / NEFT ची सुविधा उपलब्ध् करुन दिली आहे. ► सदर ॲपद्वारे ग्राहकांना खालील अतिरिक्त् सेवा दिल्या आहेत. अ. खातेची शिल्लक् तपासणी ब. खाते उतारा पाहणे. क. चेकबुक मागणी करणे. ड. मुदतबंद व रिकरिंग ठेव खाते उघडणे. इ. बँक अंतर्गत इतर खात्यामध्ये रक्कम् वर्ग करणे. ई. मोबाईल ॲपद्वारे मोबाईल / टेलिफोन बिल,डिश टि.व्ही.रिचार्ज, वीज बिल, पाणी बिल इ.बिल भरणा करणेसाठी BBPS सुविधा मोबाईल ॲपवर कार्यान्वित केली आहे.