सदर योजनेमधून शेतकरी सभासदांना बैलजोडी,गाडी,एक्का,जुना / नविन ट्रॅक्टर, ट्रेलर, शेती औजारे, नविन पॉवर टिलर, जुने / नविन ऊस तोडणी व भरणा यंत्र इ.साठी कर्ज मंजूर केले जाते.
अ) बैलजोडी-गाडी,एक्का खरेदी :
निर्वेध व निष्कर्जी क्षेत्र धारणा :
बागायत 0.20 हे.आर. व जिरायत 0.40 हे.आर.
2.युनिट कॉस्ट / कोटेशनचे 85% किंवा परतफेड क्षमता यापैकी कमी रक्कमेस कर्ज मंजूरी.
ब)ट्रॅक्टर ,ट्रेलर,शेती औजारे खरेदी :
1.निर्वेध व निष्कर्जी क्षेत्र धारणा :
नविन युनिटसाठी :- बागायत 1.60 हे.आर. व जिरायत 3.20 हे.आर.
जुन्या युनिटसाठी :
बागायत 1.00 हे.आर. व जिरायत 2.00 हे.आर.
2.उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक ,कारखाना हमीपत्र.
3.नविन युनिटसाठी कोटेशनचे 85% किंवा परतफेड क्षमते इतपत कर्ज मंजूरी
व जुन्या युनिटसाठी व्हॅल्यूएटरने केलेली किंमत किंवा विमा किंमत किंवा खरेदी किंमत यापैकी कमी रक्कमेच्या 85% इतपत परतफेड क्षमता विचारात
घेवून कर्ज मंजूरी दिली जाईल.
क)नविन पॉवर टिलर :-
1. निर्वेध निष्कर्जी क्षेत्रधारणा :
बागायत 0.40 हे.आर. व जिरायत 0.80 हे.आर.
2. कोटेशनचे 85% किंवा परतफेड क्षमता यापैकी कमी रक्कमेस कर्ज मंजूरी.
ड) नविन मळणी मशिन :
1.निर्वेध व निष्कर्जी क्षेत्रधारणा :
बागायत 0.20 हे.आर. व जिरायत 0.40 हे.आर.
2.कोटेशनचे 85% किंवा परतफेड क्षमता यापैकी कमी रक्कमेस कर्ज मंजूरी.
इ) ऊस तोडणी व भरणा यंत्र :-
1. मुख्य तारण यंत्र व सहतारण निर्वेध व निष्कर्जी क्षेत्रधारणा :
नविन यंत्र – बागायत 2.00 हे.आर. जुने यंत्र -बागायत 1.20 हे.आर.
2.नविन यंत्राचे कोटेशनचे 75% व जूने तोडणी यंत्राचे बाबतीत व्हॅल्यूएटरने केलेली किंमत किंवा खरेदी / टेकओव्हर यापैकी कमी किंमतीचे 75% परतफेड क्षमतेचे अधिन राहून कर्ज मंजूरी.
3.कारखाना हमीपत्र व उत्पन्न खर्चाचे अंदाजपत्रक.
4. जुने यंत्र खरेदी / टेकओव्हरचे बाबतीत संचकार पत्र,वित्तीय संस्थेचा ना
हरकत दाखला.
5 वर्षाहून अधिक व 7 वर्षाचे आतील जुने यंत्र खरेदीसाठी शेत जमीन तारणगहाण खतान्वये तारण द्यावी लागेल.