x
logo
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजने अंतर्गत मध्यम मुदत कर्ज

उद्देश

मराठा समाजातील 18 ते 60 या वयोमर्यादेतील आर्थिकदृष्टया मागास बेरोजगार तरुणांना उद्योग उभारणी करीता मध्यम मुदत कर्ज.

पात्रता

कोल्हापूर जिल्हयातील रहिवाशी, महामंडळाकडून LOI (Letter of intent) घेतला असावा, वार्षिक उत्पन्न रु.8.00 लाख मर्यादेत, निर्वेध व निष्कर्जी शेती / बिगरशेती स्थावर असावी.

कर्ज मर्यादा

शासकीय मुल्यांकनाच्या दुप्पट कमाल कर्ज मर्यादा रु.15.00 लाख इतपत.

व्याजदर

द.सा.द.शे.13% (महामंडळाकडून द.सा.द.शे.12% व्याज परतावा दिला जातो  )

कागदपत्रे

कर्ज मागणी अर्ज, फोटो, केवायसी, ‘ब’ वर्ग सभासद, LOI, शाळा सोडलेचा दाखला, वार्षिक उत्पन्न दाखला, तारण द्यावयाच्या स्थावर मिळकतीचे उतारे, बँक पॅनेलवरील व्हॅल्युएटर यांचा मुल्यांकन अहवाल, बँक पॅनेलवरील वकील यांचा 15 वर्षाचा सर्च रिपोर्ट, प्रकल्प अहवाल, कोटेशन, इस्टीमेंट, नकाशा, बांधकाम परवाना इत्यादी.

जामिनदार

विहीत नमुन्यात माहिती, फोटो, केवायसी,, स्थावर मिळकत उतारे, ‘ब’ वर्ग सभासद

अटी

1.

रजि. तारण गहाण खताने बोजा नोंद करणे

2.

प्रकल्प अहवालानुसार प्रकल्प पुर्तता करणे आवश्यक व त्यानुसार कर्जाची उचल दिली जाईल.

3.

अर्जदार अन्य बँकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

तसेच गोकुळ / वारणा दुध संघाच्या हमी पत्रावर व दुध संस्थेच्या वसुली हमी ठरावानुसार परराज्यातील 2 म्हैश खरेदीसाठी रु.2.00 लाखा पर्यंत कर्ज देणेत येते. यासाठी कर्जदार यांनी ग्रामपंचायत असेसमेंट किंवा 7/12 उताऱ्या कर्जाचा बोजा नोंद करुन उतारा देणे आवश्यक आहे.