मुनष्यबळ विकासासाठी शिक्षणाची नितांत गरज असते. कोणत्याही देशासाठी शिक्षण हे बळ देणारे साधन आहे. याकरिता बँकेने शेतकऱ्यांचे पाल्यासाठी शैक्षणिक कर्ज धोरण संमत केलेले आहे. 1. विद्यार्थी एच.एस.सी. (10+2 किंवा तत्सम)परिक्षा पास झालेल्या विद्यार्थ्याने उच्च शिक्षणासाठी मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतला पाहिजे. 2. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वैद्यकीय, हिशेब व्यवसाय, कृषि, पशुवैद्यकीय तसेच मान्यता प्राप्त संस्थेमधून भारत व भारताबाहेर दिले जाणारे नोकरी व व्यवसायाभीमुख तांत्रीक / व्यावसायीक पदविका,पदवी,पदव्युत्तर शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध. 3. शैक्षणिक-फी, परिक्षा, ग्रंथालय, प्रयोगशाळा फी, प्रवास खर्च, विमा, संगणक खरेदी इ. खर्चाचा समावेश शैक्षणिक कर्जासाठी विचारात घेतला जाईल. याकरिता शैक्षणिक संस्थेचे अधिकृत खर्चाचे कोटेशन प्रस्तावासोबत जोडले जाईल. 4. कर्ज मर्यादा – देशांतर्गत व देशाबाहेर कमाल रु.30.00 लाख. 5. स्वगुंतवणूक – रु.4.00 लाखावरील रक्कमेसाठी देशाअंतर्गत 5% व देशाबाहेर 15%. 6. तारण – रु.1.00 लाख कर्ज मर्यादेसाठी 0.05 हे.आर.पीकाऊ शेत जमीन व त्यावरील कर्ज मर्यादेसाठी त्यापेटीत क्षेत्रधारणा आवश्यक. 7. कर्ज परतफेड कालावधी – अभ्यासक्रम कालावधी व सवलतीसह 1 वर्षे कालावधीत व्याज रक्कमेची वसूली तद्नंतर कर्जाचे 5 ते 7 हप्ते बांधणेत येतील. 8. शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण झालेनंतर पाल्य नोकरी / व्यवसाय करु लागलेनंतर पाल्याकडून कर्ज वसूल केले जाईल.