सदर योजनेअंतर्गत संस्थेच्या सभासदांना ऑईल इंजिन,इले.मोटर,सब मर्सिबल पंप
खरेदी,पाईप लाईन,उपसा सिंचन योजना,ठिबक व तुषार सिंचन व नवीन / जूनी विहीर खुदाई व दुरुस्तीकरिता कर्ज मंजूर केले जाते.
अ) नविन विहीर खुदाई व बांधकाम / जुनी विहीर दुरुस्ती व बांधकाम :-
1. सल्लागार अभियंता यांचे प्लॅन व इस्टीमेट जोडले पाहिजे.
2. भुजल तज्ञाचा पाणी उपलब्धतेचा दाखला सादर केला पाहिजे.
3. जुन्या विहीरीचे बाबतीत 7/12 पत्रकावर विहीरीची नोंद पाहिजे.
4. सामाईक विहीर असलेस सर्व सहहिस्सेदारांची संमतीपत्र जोडले पाहिजे.
5. एस्टीमेटचे 85% किंवा परतफेड क्षमता यापैकी कमी रक्कमेस कर्ज मंजूरी दिली जाईल.
ब) ऑईल इंजिन / इले.मोटर / सबमर्सिबल पंप खरेदी / पाईप लाईन खरेदी :
1. रु.3.00 लाखापर्यंत योजना खर्चास समजूतीचा नकाशा आवश्यक.
2. रु.3.00 लाखावरील योजना खर्चास सल्लागार अभियंत्याचे प्लॅन व इस्टीमेट सादर केले पाहिजे. रु.10.00 लाखावरील योजना खर्चास सर्व्हे रिपोर्टसह प्लॅन व इस्टीमेट आवश्यक.
3.
चर खुदाई,पाईप लाईन व पंप इ.चे (अधिकृत विक्रेत्याचे)कोटेशन.
4. विज वितरण कंपनीकडे डिपॉझीट भरलेची पावती किंवा वाढीव पाईप
लाईनसाठी चालू विज बिल पावती.
I)
विहीर / बोअरवेल वरील योजनेसाठी :
1. विहीर / बोअरची नोंद 7/12 उताऱ्यावर असली पाहिजे.
2. विहीर सामाईक असलेस सर्व हिस्सेदारांचे संमत्तीपत्र.
3. एकरावरील योजनेसाठी आवश्यक डिसचार्ज उपलब्धतेचा भुजल तज्ञाचा
दाखला आवश्यक.
4. विज वितरण कंपनीकडे डिपॉझीट भरलेची पावती किंवा वाढीव पाईप
लाईनसाठी चालू विज बिल पावती.
II)
नदीवरील योजनेसाठी :
1. पाटबंधारे विभाग / नदीवरील धरण सोसायटी यांचा उपसायंत्र
बसविणेबाबतचा परवाना, पाणी परवाना खरीप ,रब्बी,ऊस वर्गवारीसह (भिज क्षेत्र)प्रस्तावासोबत जोडला पाहिजे.
2. अद्यावत विज बिल / विज डिपॉझीट भरलेली पावती.
3. वीज / पाणी परवानाधारक मयत असलेस परवाना हस्तांतरण करणेबाबत वारसांची केलेल्या अर्जाची पोहोच.
III) सौर उर्जावरील उपसा संच खरेदी :
1. शासन मान्य कंपनीचे कोटेशन व प्रकल्प अहवाल प्रस्तावासोबत सादर केला पाहिजे.
2. सदर संचास भारत सरकारच्या Ministry of New & Renewable Energy (MNRE) ने प्रमाणीत केले असले पाहिजे.
3. कोटेशन किंमतीचे 85% किंवा परतफेड क्षमता यापैकी कमी रक्कमेस कर्ज मंजूरी दिली जाईल. नॉन ISO कंपनीचे कोटेशन देखील प्रस्तावासोब स्विकारणेचे आहे.
IV) ठिबक सिंचन / तुषार सिंचन :
1. ठिबक / तुषार सिंचन पुरवठा करणारी कंपनी ISO मानांकन प्राप्त असली पाहिजे.
2. कंपनीने सर्व्हे रिपोर्टसह प्रोजेक्ट रिपोर्ट,प्लॅन इस्टीमेट व कोटेशन प्रस्तावा सोबत जोडले पाहिजे.
3. विहीर / बोअर नोंदीचा 7/12 उतारा जोडला पाहिजे.
4. चालू विज बिल भरणा केलली पावती.