शेतकरी व त्यांच्या पालकांना शेती बरोबरच विविध प्रकारची सेवा / उद्योग
व्यवसायाकरिता खेळते भांडवल व गुंतवणूक स्वरुपाचा रु.200.00 लाख पर्यंतच्या कर्ज
पुरवठा सदर धोरणाअंतर्गत केला जातो.
संस्था पांत्रता :-
1.
संस्था सलग 3 वर्षात नफ्यात असावी,सभासद कर्ज वसूली किमान 85% व
विनाथक इष्ट दुरावा 5% व संस्था बँक कर्ज थकबाकीत नसावी.
2.
अद्यावत वैधानिक लेखापरिक्षण ऑडीट वर्ग अ व ब , मुदती कर्ज 25% येणेबाकी,
समान लेखापध्दती प्रमाणे कामकाज,सभसदांनी निवडून दिलेले संचालक मंडळ.
सभासद निकष :
1.
सेवा / उद्योग व्यवसाय उभारणीसाठी खेळते भांडवल व गुंतवणूक कर्जासाठी
रु.200.00 लाख परतफेड क्षमता विचारात घेवून कर्ज मंजूरी.
2.
सनदी लेखापाल (C.A.) यांचा सविस्तर प्रकल्प् अहवाल प्रस्तावासोबत सादर केला
पाहिजे.
3.
सदर कर्जास तारण म्हणून अर्जदार यांचे स्वमालकीची संपूर्ण निर्वेध स्थावर
मिळकत तारण दिली पाहिजे. तारण द्यावयाचे मिळकतीचा बँकेचे पॅनेलवरील
वकीलांकडून शोध अहवाल व व्हॅल्युएटरकडून व्हॅल्यूएशन रिपोर्ट घेतला पाहिजे.
व्हॅल्युएशनचे 50% किंवा परतफेड क्षमता यापैकी कमी रक्कमेस कर्ज मंजूरी दिली
जाईल.
4.
योजनेचे प्लॅन व इस्टीमेट इंजिनिअर यांचेकडून घेतले पाहिजे. तसेच वस्तू व
मशिनरीचे कोटेशन प्रस्तावासोबत जोडले पाहिजे.
5.
अर्जदारांचे शैक्षणिक व व्यावसायीक पात्रता पूर्ण असली पाहिजे. तसेच
व्यवसायासाठी आवश्यक त्या परवानगी घेतली पाहिजे.
6.
अर्जदाराचा सिबील रिपोर्ट समाधानकारक असावा.
7.
प्रकल्पाची अनुकूलता व पोषकता तपासली जाईल.
8.
व्यावसायाची जागा,भाडेकरार,दळणवळण सोय,कच्चा माल उपलब्धता, कामगार,
विज, पाणी व विक्री व्यवस्था पाहिली जाईल.