x
logo
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ( CMEGP ) अंतर्गत कर्ज पुरवठा करणेचे धोरणा

)   योजनेचा उद्देश

1.

सध्या कार्यरत असलेले व नविन स्थापित होणारे वैयक्तीक उद्योग यांची पत मर्यादा वाढविणे.

2.

उत्पादनाचे ब्रॅडींग व विपणन अधिक बळकट करुन त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे.

3.

सामाईक सेवा जसे की , साठवणुक , प्रक्रिया , सुविधा , पॅकेजिंग व विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सुक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे.

)   पात्रता

1.

कर्ज मागणीदार कोल्हापूर जिल्हृयातील रहिवाशी असावा.

2.

अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण व अधिकतम 45 वर्षे असावे ( अनुसुचित जाती / जमाती / महिला / अपंग / माजी सैनिक यांचेसाठी 50 वर्षे ).

3.

अर्जदाराची शैक्षणिक पात्रता  रु.20 लाखापर्यतच्या  प्रकल्पासाठी किमान 7 वी पास व रु.25 लाखापर्यतच्या प्रकल्पासाठी 10 वी पास  (कमाल कर्ज मर्यादा रु.40.00 लाख).

4.

प्रकल्प् खर्च उभारणी व राज्य् शासनाचे आर्थिक सहाय्य (मार्जिन मनी-अनुदान)


प्रवर्ग

स्वगुंतवणूक

अनुदान

बँक कर्ज

शहरी

ग्रामीण

शहरी

ग्रामीण

सर्वसाधारण

10%

15%

25%

75%

65%

विशेष्‍ प्रवर्ग
(अनुसुचित जाती / जमाती /महिला / अपंग / माजी सैनिक)

5%

25%

35%

70%

60%

 

अ)

रक्कम :- तज्ञ व्यक्तीकडून तयार केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) विचारात घेवून सादर केलेला प्रकल्प अहवाल , कोटेशन , इस्टीमेटच्या कमाल 75% इतपत व तारण मिळकतीचे सरकारी मुल्यांकन रक्कमेच्या दुप्पट मुल्य ( खेळते भांडवलासह ) या दोहोंपैकी कमी असणारी रक्कमे इतपत मध्यम मुदत कर्ज रक्कम मंजूर करणेत येईल. उर्वरीत रक्कम स्वभांडवलातून उभी करणेची आहे.


 

ब)

कर्जाची मुदत :- मध्यम मुदत कर्जाची मुदत 5 ते 7 वर्षे राहिल. (60 ते 84 महिने)

 

क)

व्याजदर :- सदर कर्जाचा सद्याचा व्याजदर द.सा.द.शे. 12 % (मासिक व्याज आकारणी) इतका राहिल. मंजूर कर्जाचा हप्ता मासिक (EMI) पध्दतीने आकारणेत येईल.


 

ड)

तारण :- सदर कर्जाकरीता कर्जदार , सहकर्जदार , यांचे नांवे असणारी निर्वेध बिगर शेती स्थावर मिळकत तारण देणेची आहे.)खेळते भांडवली कर्ज (कॅश क्रेडिट) Ø

 

अ)

पात्र रक्कम :- प्रकल्प अहवालातील वार्षिक उलाढाल व खेळते भांडवल आवश्यकता विचारांत घेऊन प्रकल्प अहवालामधील दर्शविलेल्या विक्री रक्कमेच्या जास्तीत जास्त 20% प्रकल्प  प्रमाणे   खेळते भांडवलीकरीता कॅश क्रेडिट कर्ज मंजूर करणेत येईल.

 

ब)

कर्जाची मुदत :- खेळते भांडवली कर्जाची मुदत 1 वर्ष राहिल. सदर कर्जास सध्याचा व्याजदर द.सा.द.शे.12.50% (मासिक आकारणी) इतका राहिल. मंजूर कॅश क्रेडिट कर्जाचे दरवर्षी नुतणीकरण करणेचे आहे.

 

क)

तारण :- सदर कर्जाकरीता कर्जदार / सहकर्जदार / यांच्या नांवे असणारी निर्वेध बिगर शेती स्थावर मिळकत तारण देणेची आहे.
)आवश्यक कागदपत्रेØ

1.

अर्जदार यांचा बँकेच्या विहीत नमुन्यात कर्ज मागणी अर्ज.

2.

अर्जदार व जामिनदार ‘ब’ वर्ग सभासद झालेचा पुरावा (काँन्ट्रा / पावती) .

3.

कर्जदार / सहकर्जदार  यांचे निर्वेध बिगरशेती  उतारे


4.

सदर कर्जास तारण देणाऱ्या स्थावर बिगरशेती (N.A.) मिळकतीचा  बँक पॅनेलवरील व्हॅल्युएअर यांचा मुल्यांकन अहवाल किंवा दुय्यम निबंधक कार्यालयाचा यांचा मुल्यांकन दाखला.

5.

कर्जास तारण देणाऱ्या बिगरशेती (N.A.) मिळकतीचा बँक पॅनेलवरील वकिलांचा 15 वर्षांचा शोध अहवाल ( सर्च रिपोर्ट ) .


6.

कर्जदार व जामिनदार यांचे फोटो, फोटो आयडेंटीटी कार्ड ( आधारकार्ड / मतदान ओळखपत्र )  व पत्याचा पुरावा

जामिनदार

विहीत नमुन्यात वैयक्तिक माहिती, संम्मती पत्र, अद्यावत 1 पासपोर्ट साईज फोटो, पॅनकार्ड , आधारकार्ड , रेशनकार्ड , विज बिल , ड्रायव्हिंग लायसन्स , मतदान ओळखपत्र , पासपोर्ट , घरफाळा पावती इत्यादींची स्वप्रमाणित छायांकित प्रत (यापैकी तीन), स्थावर मिळकतीचे उतारे.