x
logo
उच्च शिक्षणाकरिता कर्ज

मुनष्यबळ विकासासाठी शिक्षणाची नितांत गरज असते. कोणत्याही देशासाठी
शिक्षण हे बळ देणारे साधन आहे. याकरिता बँकेने शेतकऱ्यांचे पाल्यासाठी शैक्षणिक कर्ज
धोरण संमत केलेले आहे.
1. विद्यार्थी एच.एस.सी. (10+2 किंवा तत्सम)परिक्षा पास झालेल्या विद्यार्थ्याने उच्च शिक्षणासाठी मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतला पाहिजे.
2. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वैद्यकीय, हिशेब व्यवसाय, कृषि, पशुवैद्यकीय तसेच मान्यता प्राप्त संस्थेमधून भारत व भारताबाहेर दिले जाणारे नोकरी व व्यवसायाभीमुख तांत्रीक / व्यावसायीक पदविका,पदवी,पदव्युत्तर शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध.
3. शैक्षणिक-फी, परिक्षा, ग्रंथालय, प्रयोगशाळा फी, प्रवास खर्च, विमा, संगणक खरेदी इ. खर्चाचा समावेश शैक्षणिक कर्जासाठी विचारात घेतला जाईल. याकरिता शैक्षणिक
संस्थेचे अधिकृत खर्चाचे कोटेशन प्रस्तावासोबत जोडले जाईल.
4. कर्ज मर्यादा – देशांतर्गत व देशाबाहेर कमाल रु.30.00 लाख.
5. स्वगुंतवणूक – रु.4.00 लाखावरील रक्कमेसाठी देशाअंतर्गत 5% व देशाबाहेर 15%.
6. तारण – रु.1.00 लाख कर्ज मर्यादेसाठी 0.05 हे.आर.पीकाऊ शेत जमीन व त्यावरील
कर्ज मर्यादेसाठी त्यापेटीत क्षेत्रधारणा आवश्यक.
7. कर्ज परतफेड कालावधी – अभ्यासक्रम कालावधी व सवलतीसह 1 वर्षे कालावधीत
व्याज रक्कमेची वसूली तद्नंतर कर्जाचे 5 ते 7 हप्ते बांधणेत येतील.
8. शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण झालेनंतर पाल्य नोकरी / व्यवसाय करु लागलेनंतर
पाल्याकडून कर्ज वसूल केले जाईल.