x
logo
केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग

)   योजनेचा उद्देश

सध्या कार्यरत असलेले व नविन स्थापित होणारे वैयक्तीक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग यांची पत मर्यादा वाढविणे.

उत्पादनाचे ब्रॅडींग व विपणन अधिक बळकट करुन त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारीक रचनेमध्ये आणणेसाठी सहाय्य करणे.

सामाईक सेवा जसे की , साठवणुक , प्रक्रिया , सुविधा , पॅकेजिंग व विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सुक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे.

)   पात्रता

1.

उद्योगामध्ये 10 पेक्षा कमी कामगार कार्यरत असावेत.

2.

कर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार असावा.

3.

सदर उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करुन देणेची तयारी असावी.

4.

कर्ज मागणीदार कोल्हापूर जिल्हृयातील रहिवाशी असावा.

5.

अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे असावे.

6.

पात्र प्रकल्प खर्चाच्या किमान 10% ते 40% इतपत लाभार्थि हिस्सा देण्याची व उर्वरीत बँक मुदत कर्ज घेणेची तयारी असावी.

7.

एका कुटुंबातील एकच व्यक्ती सदर योजनेस पात्र राहिल.

8.

कर्ज मागणीदार हा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

9.

केंद्र शासनाचे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे उन्नयंन (PM FME) योजने अंतर्गत पात्र असणारे सर्व व्यवसाय , उद्योग इत्यादी.

प्रकल्पाची यादी

 

नाशवंत शेतीमाल (फळे व भाजीपाला), तृणधान्ये , कडधान्ये , तेलबिया , मत्सोत्पादन , मसाला पिके , दुग्ध व पशु उत्पादन , किरकोळ वन उत्पादन इत्यादी, सद्य स्थितीत Non-ODOP उत्पादनामध्ये कार्यरत सुक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे स्तरवृध्दी / विस्तारीकरण / आधुनिकीकरण या लाभासाठी पात्र राहतील. योजने अंतर्गत सहाय्यासाठीच्या सामाईक पायाभुत सुविधा, कृषी उत्पादनाची वर्गवारी, प्रतवारी , साठवणूक करण्यासाठी जागा , इमारत तसेच शेती क्षेत्राच्या जवळ शीतगृहाची उभारणी इत्यादीचा समावेश राहिल.

)   व्यक्ती कर्जदारासाठी निकषØ

1.

लाभार्थि कर्जदार , सहकर्जदार व जामिनदार हे बँकेचे ‘ ब ’ वर्ग सभासद होणे आवश्यक आहे.

2.

वेबपोर्टलवर अर्जदार यांनी प्रथम PM FME या साईटवर अर्जदाराचे लॉगीन करुन आपल्या बँकेच्या IFSC कोड देऊन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.(www.pmfme.mofpi.gov.in)

3.

कर्ज मंजूरी नंतर अनुदार रक्कम प्रकल्प रक्कमेच्या 35% किंवा कमाल रक्कम रु.10.00 लाख इतकी केंद्र शासनाकडून जमा होणेसाठी  www.pmfme.mofpi.gov.in या संकेत स्थळा वरील PM FME MIS PORTAL वर Online अर्ज सादर करावा.

4.

कर्ज मागणी करणाऱ्या उमेदवाराचे नांवे स्थावर बिगर शेती (N.A.)मालमत्ता असावी. जर कर्ज मागणीदारांचे नांवे बिगर शेती (N.A.) स्थावर मालमत्ता नसलेस कुटुंबातील अन्य व्यक्ती (आई,वडील,बहीण भाऊ , रक्ताच्या नात्यातील इ.) यांचे नांवे बिगरशेती मालमत्ता असलेस त्यांना सहकर्जदार करता येईल.

5.

अर्जदार यांचे व्यवसायाचे सर्व व्यवहार आपले बँकेमार्फत होणे आवश्यक आहे.

6.

सदर कर्जाची मुदती व खेळती भांडवल एकूण वैयक्तीक मर्यादा ही कमाल रु.40.00 लाख राहिल.

7.

सदर कर्जासाठी बँकेच्या प्रचलित धोरणाप्रमाणे बिगरशेती (N.A.) असलेली निर्वेध निष्कर्जी मिळकत तारण देणे आवश्यक आहे. तद्नंतर सदर मिळकतीवर कर्ज उचलीपूर्वी रजि.तारण गहाण दस्ताने उताऱ्यावर बोजा नोंद करुन बोजा नोंद केलेचा उतारा शाखेत देणे आवश्यक आहे.

8.

बँक पॅनेलवरील वकिलांचा स्थावर मिळकतीचा गत 15 वर्षांचा शोध अहवाल (सर्च रिपोर्ट) आवश्यक आहे.

)मध्यम मुदत कर्ज

अ)

पात्र रक्कम :- प्रकल्प तज्ञ व्यक्तीकडून तयार केलेला प्रकल्प अहवाल विचारांत घेऊन व्यवसायाचे प्रकल्प उभारणी , व्यवसायाचे आधुनिकीकरण / नुतणीकरण करणेच्या अनुषंगाने सादर केलेला प्रकल्प अहवाल , कोटेशन , इस्टीमेटच्या कमाल 75% इतपत व तारण मिळकतीचे सरकारी मुल्यांकन रक्कमेच्या दुप्पट मुल्य खेळते भांडवलासह या दोहोंपैकी कमी असणारी रक्कमे इतपत मध्यम मुदत कर्ज रक्कम पात्र होईल.उर्वरीत रक्कम स्वभांडवलातून उभी करणेची आहे.

ब)

कर्जाची मुदत :- मध्यम मुदत कर्जाची मुदत 5 ते 7 वर्षे राहिल. (60 ते 84 महिने) यापैकी एक वर्ष सवलतीचा काळ राहिल. सवलतीचे काळामध्ये व्याज नियमित भरणेचे आहे.

क)

व्याजदर :- सदर कर्जाचा सद्याचा व्याजदर द.सा.द.शे. 12% इतका राहिल. मंजूर कर्जाचा हप्ता मासिक (EMI) पध्दतीने आकारणेत येईल.

ड)

तारण :- सदर कर्जाकरीता कर्जदार , सहकर्जदार , यांचे नांवे असणारी निर्वेध बिगर शेती स्थावर मिळकत तारण देणेची आहे.

)खेळते भांडवली कर्ज (कॅश क्रेडिट)

अ)

पात्र रक्कम :- प्रकल्प अहवालातील वार्षिक उलाढाल व खेळते भांडवल आवश्यकता विचारांत घेऊन प्रकल्प अहवालामधील दर्शविलेल्या विक्री रक्कमेच्या जास्तीत जास्त 20% इतपत खेळते भांडवलीकरीता कॅश क्रेडिट कर्जाची पात्र रक्कम राहिल. (कमाल रु.10.00 लाख)

ब)

कर्जाची मुदत :- खेळते भांडवली कर्जाची मुदत 1 वर्ष राहिल. सदर कर्जास सध्याचा व्याजदर 11% इतका राहिल. मंजूर कॅश क्रेडिट कर्जाचे दरवर्षी नुतणीकरण करणे आवश्यक राहिल.

क)

तारण :- सदर कर्जाकरीता कर्जदार / सहकर्जदार / यांच्या नांवे असणारी निर्वेध बिगर शेती स्थावर मिळकत तारण देणेची आहे.

आवश्यक इतर कागदपत्रे

अर्जदार यांचा बँकेच्या विहीत नमुन्यात कर्ज मागणी अर्ज देणे आवश्यक आहे.

अर्जदार व जामिनदार ‘ब’ वर्ग सभासद झालेचा पुरावा (काँन्ट्रा / पावती) जोडली पाहिजे.

सदर कर्जास तारण देणाऱ्या स्थावर बिगरशेती (N.A.) मिळकतीचे बँक पॅनेलवरील व्हॅल्युएअर यांचा मुल्यांकन अहवाल किंवा दुय्यम निबंधक कार्यालयाचा मुल्यांकन दाखला

कर्जदाराने कर्जास तारण देणाऱ्या बिगरशेती (N.A.) मिळकतीचा बँक पॅनेलवरील वकिलांचा 15 वर्षांचा सर्च रिपोर्ट देणेचा आहे.

कर्जदार व जामिनदार यांचे फोटो (फोटो आयडेंटीटी कार्ड / आधारकार्ड / मतदान ओळखपत्र) , रेशनिंग कार्ड झेरॉक्स.

कर्जदाराचे आधारकार्ड बँक खात्यांशी लिंक करणे आवश्यक आहे.

सक्षम व्यक्तीकडून प्रकल्प अहवाल सविस्तर सादर केला पाहिजे.

व्यवसायानुसार व्यवसाय परवाना / व्यवसाय ना हरकत दाखला , अन्न व औषध परवाना (फुड लायसन्स) , उद्यम रजिस्ट्रेशन इत्यादी शासकीय परवाने आवश्यक.

कर्जदार यांचे निर्वेध बिगरशेती उतारे व जामिनदार यांचे स्थावर उतारे

उत्पनाबाबत व्यवसायानुसार लेखापरिक्षीत आर्थिक पत्रके व 3 वर्षाचे इन्कमटॅक्स रिटर्न्स

शासनाकडून अनुदान रक्कम न मिळाल्यास स्वभांडवलातून कर्ज रक्कम पूर्ण फेड करत असलेबाबत रु.100/- चे स्टँम्पवर ॲफिडेव्हीट

कर्जदार यांचे सद्यस्थितीत इतर बँकात चालु असलेले कर्ज व्यवहार / सेव्हिंग / चालु खातेचे 1 वर्षाचे उतारे

जामिनदाराकडून घ्यावयाची कागदपत्रे

विहीत नमुन्यात वैयक्तिक माहिती, संम्मती पत्र, अद्यावत 1 पासपोर्ट साईज फोटो, पॅनकार्ड , आधारकार्ड , रेशनकार्ड , विज बिल , ड्रायव्हिंग लायसन्स , मतदान ओळखपत्र , पासपोर्ट , घरफाळा पावती इत्यादींची स्वप्रमाणित छायांकित प्रत (यापैकी तीन), स्थावर मिळकतीचे उतारे.