x
logo
कृषि यांत्रिकीकरण
सदर योजनेअंतर्गत संस्थेच्या सभासदांना ऑईल इंजिन,इले.मोटर,सब मर्सिबल पंप खरेदी,पाईप लाईन,उपसा सिंचन योजना,ठिबक व तुषार सिंचन व नवीन / जूनी विहीर खुदाई व दुरुस्तीकरिता कर्ज मंजूर केले जाते.
अ) नविन विहीर खुदाई व बांधकाम / जुनी विहीर दुरुस्ती व बांधकाम :-
1. सल्लागार अभियंता यांचे प्लॅन व इस्टीमेट जोडले पाहिजे.
2. भुजल तज्ञाचा पाणी उपलब्धतेचा दाखला सादर केला पाहिजे.
3. जुन्या विहीरीचे बाबतीत 7/12 पत्रकावर विहीरीची नोंद पाहिजे.
4. सामाईक विहीर असलेस सर्व सहहिस्सेदारांची संमतीपत्र जोडले पाहिजे. 5. एस्टीमेटचे 85% किंवा परतफेड क्षमता यापैकी कमी रक्कमेस कर्ज मंजूरी दिली जाईल.
ब) ऑईल इंजिन / इले.मोटर / सबमर्सिबल पंप खरेदी / पाईप लाईन खरेदी :
1. रु.3.00 लाखापर्यंत योजना खर्चास समजूतीचा नकाशा आवश्यक.
2. रु.3.00 लाखावरील योजना खर्चास सल्लागार अभियंत्याचे प्लॅन व इस्टीमेट सादर केले पाहिजे. रु.10.00 लाखावरील योजना खर्चास सर्व्हे रिपोर्टसह प्लॅन व इस्टीमेट आवश्यक.
3. चर खुदाई,पाईप लाईन व पंप इ.चे (अधिकृत विक्रेत्याचे)कोटेशन.
4. विज वितरण कंपनीकडे डिपॉझीट भरलेची पावती किंवा वाढीव पाईप लाईनसाठी चालू विज बिल पावती.
I) विहीर / बोअरवेल वरील योजनेसाठी :
1. विहीर / बोअरची नोंद 7/12 उताऱ्यावर असली पाहिजे.
2. विहीर सामाईक असलेस सर्व हिस्सेदारांचे संमत्तीपत्र.
3. एकरावरील योजनेसाठी आवश्यक डिसचार्ज उपलब्धतेचा भुजल तज्ञाचा दाखला आवश्यक.
4. विज वितरण कंपनीकडे डिपॉझीट भरलेची पावती किंवा वाढीव पाईप लाईनसाठी चालू विज बिल पावती.
II) नदीवरील योजनेसाठी :
1. पाटबंधारे विभाग / नदीवरील धरण सोसायटी यांचा उपसायंत्र बसविणेबाबतचा परवाना, पाणी परवाना खरीप ,रब्बी,ऊस वर्गवारीसह (भिज क्षेत्र)प्रस्तावासोबत जोडला पाहिजे.
2. अद्यावत विज बिल / विज डिपॉझीट भरलेली पावती.
3. वीज / पाणी परवानाधारक मयत असलेस परवाना हस्तांतरण करणेबाबत वारसांची केलेल्या अर्जाची पोहोच.
III) सौर उर्जावरील उपसा संच खरेदी :
1. शासन मान्य कंपनीचे कोटेशन व प्रकल्प अहवाल प्रस्तावासोबत सादर केला पाहिजे.
2. सदर संचास भारत सरकारच्या Ministry of New & Renewable Energy (MNRE) ने प्रमाणीत केले असले पाहिजे.
3. कोटेशन किंमतीचे 85% किंवा परतफेड क्षमता यापैकी कमी रक्कमेस कर्ज मंजूरी दिली जाईल. नॉन ISO कंपनीचे कोटेशन देखील प्रस्तावासोब स्विकारणेचे आहे.
IV) ठिबक सिंचन / तुषार सिंचन :
1. ठिबक / तुषार सिंचन पुरवठा करणारी कंपनी ISO मानांकन प्राप्त असली पाहिजे.
2. कंपनीने सर्व्हे रिपोर्टसह प्रोजेक्ट रिपोर्ट,प्लॅन इस्टीमेट व कोटेशन प्रस्तावा सोबत जोडले पाहिजे.
3. विहीर / बोअर नोंदीचा 7/12 उतारा जोडला पाहिजे.
4. चालू विज बिल भरणा केलली पावती.
1. संस्थेचे वैधानिक लेखापरिक्षण अद्यावत असले पाहिजे. (लेखापरिक्षण 2 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी प्रलंबित नसावे ) ज्या संस्थामध्ये अफरातफर,गैरव्यवहार आहेत अशा संस्थांनी संबंधीतांवर कायदेशीर कारवाई केली असली पाहिजे.
2. संस्थेच्या आदर्श पोटनियमानुसार संस्थेची सर्व दप्तरी कामकाज ,जमाखर्च
व आर्थिक पत्रके समान लेखापध्दती CAS प्रमाणे ज्या त्यावेळी पूर्ण असले पाहिजे.
3. आदर्श पोटनियम क्र.5 प्रमाणे बाहेरील कर्ज उभारणीची मर्यादा प्रस्थापीत झाली पाहिजे. जर ती होत नसलेस मा.सहकार खातेतून वाढवून घेतली पाहिजे.
4. संस्था पंचकमिटी सदस्य अगर त्यांचे संबंधित (आदर्श उपविधीत नमूद केलेप्रमाणे ) थकबाकीत नसले पाहिजेत.
5. अनिष्ट तफावतीतील संस्थांचे बाबतीत बँक धोरणाप्रमाणे बँक कर्जाचे हप्ते बांधणी केली पाहिजे.
6. संस्थेने सभासदांकडून व्याज वसूल करताना बँकेने कळविलेल्या व्याजदरापेक्षा कमाल 2% हून अधिक व्याज गाळा घेणेचा नाही.
7. कर्ज मागणीदार संस्थेने सभासद व संचालक मंडळाची सकारात्मक / नकारात्मक माहिती सीबील (CIBIL)सारख्या संस्थांना कळविणेस हरकत नाही अशी संमती देणेची आहे.
8. कर्ज मागणीदार संस्था व सभासद यांची बँकेतील सर्व ठेव रक्कम कर्ज खातेस जमा करणेचा अधिकार बँकेस राहील.
9. बँकेचे लेखी परवानगीशिवाय अन्य वित्तीय संस्थेशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाही.
10. वैधानिक लेखापरिक्षण वर्ग “ड” असणाऱ्या संस्थांना सहकार खात्याने मान्यता दिलेस अशा संस्था मुदती कर्ज पुरवठयास पात्र राहतील.
11. कर्ज मागणीदार सभासद थकबाकीदार नसला पाहिजे.
12. सभासदांची कर्ज परतफेड क्षमता विचारात घेताना एकूण शेती उत्पन्नाचे 25% व नोकरी / व्यवसायातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचे 50% इतकी राहील.
13. कर्ज मागणीदार यांनी कर्ज उचली वेळी 2 सक्षम जामीनदार दिले पाहिजेत.
14. 7/12 उताऱ्यावर अन्य वित्तीय संस्था / बँकेचे बोजे नोंद असलेस सदरचे क्षेत्र कर्ज मंजूरीतून वगळले जाईल. तथापी अर्जदार सदर वित्तीय संस्था / बँकेचा थकबाकीदार नसला पाहिजे. याकरिता संबंधित संस्थेचे दाखले कर्ज प्रस्तावासोबत सादर केले पाहिजे.
15. कर्ज उचलीपूर्वी मंजूर कर्जाचा बोजा नोंदीचे उतारे (7/12 उतारे,प्रॉपर्टी कार्ड इ.) सादर केले पाहिजेत.
16. संयुक्त सभासदांची कर्ज मागणी विचारात घेतली जाईल.