कोल्हापूर जिल्हयाचे आर्थिक स्त्रोत असणाऱ्या जिल्हा बँकेने सन 2000 सालापासून स्वंयसहाय्यता महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांना ‘आर्थिक बळ’ देऊन देशाच्या महिला सबलीकरण चळवळीत सिंहाचा वाटा उचललेला आहे. जिल्हयातील जवळजवळ 7.19 लाख महिला सदस्या बचतगटाच्या माध्यमातून बँकेचे व्यवहार करत आहेत. बचत गटांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करुन त्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केला जातो. संयुक्त देयता समुह (JLG) अंतर्गत लघूव्यवसाईकांना कर्ज पुरवठा केला जातो. तसेच SHG, DAY-NRLM (MSRLM) अंतर्गत बँकेमार्फत वाटप केलेल्या कर्जातून कोल्हापूर जिल्हयातील वैशिष्ट पूर्ण घटकांचा उदयोग, व्यवसाय गटांच्या माध्यमातून सुरु आहे. कोल्हापूरी चप्पल, तिखट मसाला, विविध प्रकारचे पापड, मातीची भांडी, बांबू क्राप्ट, कापडी पिशवी तयार करणे, कुकुट पालन इ., सामुदायिक शेती, रेशन धान्य दुकान, रॉकेल डेपो इ. बँक नेहमीच बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आपापल्या क्षेत्रात सक्षमपणे उभे राहणेसाठी प्रयत्नशील आहे. याचेच उदाहरण म्हणजे आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तर्फे बँकेने शेळी, मेंढी पालन व गारमेंट व्यवसायासाठी प्रती गटास रक्कम रु.10.00 लाख इतके कर्ज दिले आहे. तसेच शासनाचे फिनानशिअल इन्व्लुजन योजनेव्दारे गटातील महिला सदस्याची सेव्हिग खाती “0” बॅलन्सवर (NO Frill) खाती मध्ये उघडली जातात.
यांचे समवेत हातकणंगले, करवीर पूर्व / पश्चिम, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ या तालुक्यात JLG स्थापना, कर्ज वाटप व वसूली करिता
यांचे समवेत शिरोळ तालुक्यात JLG स्थापना, कर्ज वाटप व वसूली करिता
यांचे समवेत कागल व राधानगरी तालुक्यात JLG स्थापना, कर्ज वाटप व वसूली करिता
यांचे समवेत करवीर (पूर्व) तालुक्यात JLG स्थापना, कर्ज वाटप व वसूली करिता
यांचे समवेत भुदरगड व करवीर तालुक्यात JLG स्थापना, कर्ज वाटप व वसूली करिता
इंडियन इन्सिटीटयुट ऑफ मॅनेजमेट अहमदाबाद चे एच.ओ.डी.प्रोफेसर डॉ.श्री.एस.दत्ता यांनी बँकेला भेट दिली यावेळी एसएचजी / जेएलजी मधील बँकेची प्रगती व केलेल्या कामाबदल त्यांनी प्रशंसा केली आहे. नाबार्ड मुख्य कार्यालय मुंबई यांच्या वतीने बचतगटांच्या कामकाजाचे सादरीकरण करण्यासाठी नाबार्ड महाराष्ट्र कार्यालयाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सह. बँकाच्या कार्यालयाकडून उत्कृष्ठ व नाविन्यपूर्ण कामकाज करणाऱ्या महिला बचत गटांमध्ये बँकेच्या दोन गटांची निवड केली होती. यामध्ये गोधडी तयार करणारा रिध्दिसिध्दी महिला बचत गट व कोल्हापूरी चप्पलचा विरशैव ककैय्या महिला बचत गटाचे हॉटेल ताज मुंबई मध्ये नाबार्ड तर्फे प्रतिनिधीत्व करण्याची संधी बँकेस मिळाली आहे. सन 2020 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्याने नाबार्ड पुणे यांनी गारमेन्ट व्यवसाय करणाऱ्या शिवदर्शनी संयुक्त देयता समुह (JLG) इचलकरजी, ता.हातकणंगले याचा उत्कृष्ट गट म्हणून गटाचा गौरव केला. महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान (MSRLM) ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे मार्फत अंपग वयोवृध्द, वेशाव्यवसासाई महिला, मानवी मैला वाहतुक करणाऱ्या व्यक्ती व तृतीयपंथी व्यक्ती या सारख्या विशेष प्रवर्गाच्या सभासदांना कर्ज पुरवठा केला जातो.
या योजने अंतर्गत जगंदब महिला बचत, इचलकंरजी, ता.हातकणंगले या गटाला रक्कम रु.1.00 लाख वाटप केले आहे.
बचतगटांना नाबार्ड व शासनाच्या योजनांचा लाभ होणेसाठी बँकेमार्फत
Capacity Building योजने अंतर्गत कार्यशाळा घेतली जाते.
नाबार्ड सहयोगाने उत्पादीत मालाचे विक्रीसाठी प्रदर्शन भरविले जाते.
खेळते भांडवलसाठी कर्ज पुरवठा केला जातो.
प्रकल्पांर्गत कर्जपुरवठा केला जातो.
कमीत कमी 10 जास्तीत जास्त 20 महिला एका भागातील एकसारखी विचारसणी, समान आर्थिकस्तर असणाऱ्या एका घरातील एक महिला एका गटात एकत्रित येवून गटाची स्थापना केली जाते. नियमावली खालील प्रमाणे
नियमित बैठक, नियमित बचत, अंतर्गत कर्ज वितरण कर्जाची नियमित परतफेड गटाचे लेखे अद्यावत ठेवणे या नाबार्ड मार्गदर्शक पंचसुत्रीचा अवलंब करणाऱ्या सहा महिने पूर्ण झालेल्या गटास घरगुती कारण, उदयोग उभारणी इ. कारणाकरिता बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला जातो. बँक धोरण खालील प्रमाणे
कर्ज प्रकार | रक्कम रु. | मुदत | हप्ते पध्दज | व्याजदर | |
सहा महिने पूर्ण झालेल्या गटाला प्रथम कर्ज | अल्प मुदत | 100000/- | 18 महिने | EMI | 12.50 % |
प्रथम कज वेळेत परतफेड केलेनंतर व्दितीय कर्ज | मध्यम मुदत | 200000/- | 24 महिने | EMI | 12.50 % |
दुसरे कर्ज वेळेत परतफेड केलेनंतर तृतीय कर्ज | मध्यम मुदत | 250000/- | 36 महिने | EMI | 12.50 % |
तृतीय कर्ज वेळेत परतफेड केलेनंतर चतृर्थ कर्ज | मध्यम मुदत | 450000/- | 60 महिने | EMI | 12.50 % |
कुकुटपालन करिता | अल्प मुदत | 100000/- | 12 महिने | EMI | 12.50 % |
तसेच सहा महिने पूर्ण झालेल्या गटास प्रकल्प उभारणी करिता प्रकल्प कर्ज रक्कम रु.200000/- ते 500000/- पर्यन्त मुदती कर्ज पुरवठा केला जातो. प्रकल्प खर्चाच्या 75% पर्यन्त कर्ज बँकेमार्फत दिले जाते.
आणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत प्रकल्प उभारणी करिता गटास रक्कम रु.10.00 लाखाचे कर्ज पुरवठा केला जातो.
कुकुट पालन व्यवसायाकरिता गटास कमाल रक्कम रु.100000/- पर्यन्त कर्ज पुरवठा केला जातो. SHG चा कर्ज हप्ता सहामाही असतो तर व्याज मासिक आकारले जाते.
कर्ज मंजूरी व वाटप :
सहा महिने पुर्ण झालेनंतर गटाच्या अंतर्गत गरजा भागविणे करिता बँकेकडे कर्ज मागणी केली जाते. त्याकरिता बँकेकडून कर्ज मागणीचा विहीत नमुन्यातील अर्ज रु.30/- भरुन घेवून दिला जातो. तसेच ब वर्ग सभासद फी भरुन घेतली जाते. विहीत नमुन्यातील फॉर्म भरुन दिल्यानंतर निरिक्षकांकडून छाननी व शिफारस केली जाते. त्यावर विभागीय अधिकारी यांची छाननी व शिफारस होऊन प्रकरण केंद्र कार्यालय महिला विकास कक्ष येथे येते. त्याची छाननी होऊन मा.कार्यकारी समिती कडून मंजूर केले जाते. कर्ज वितरण ज्यात्या शाखेतून गटाकडून सभासदांचे सेव्हिग खातेवर रक्कम जमा दिली जाते. (सर्व सभासदांची 0 बॅलन्सला सेव्हिग्ज खाती कर्ज मागणीचे वेळी उघडून घेतली जातात.)
महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्न्ती अभियान (MSRLM)
किमान 10 किमाल 20 महिला एका भागातील, समान आर्थिकस्तर असणाऱ्या ग्रामिण भागातील गरीबातील गरीब महिला एकत्र येवून गटाची स्थापना पंचायत समिती यांचे मार्फत केली जाते. 1 एप्रिल 2013 रोजी पासून MSRLM योजना कार्यन्वित सुरु झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागाने महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियानाची स्थापना केली आहे.
या योजने अंतर्गत बँकेने 1 जून 2023 पासून धोरण अंमलबजावणी केली आहे.
गरीबांना वित्तीय सेवा पुरविणे गरीबांची व त्यांच्या संस्थाची व त्यांच्या संस्थाची क्षमता वृध्दी व कौशल्य वृध्दी करणे आणि शाश्वत उपजिविकेची साधने उपलब्ध् करुन देवून त्यांना द्रारिद्र रेषे बाहेर येण्यासाठी मदत करणे हे आभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
वरील सर्व बाबत पंचायत समिती बँक सखी यांचेकडून मार्गदर्शन केले जाते.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे दशसुत्रीचे निकषाचे पालन करणाऱ्या सहा महिने पूर्ण झालेल्या गटास बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला जातो. त्याचे धोरण खालील प्रमाणे.
कर्ज प्रकार | रक्कम | मुदत | हप्ते | व्याजदर | उद्देश | |
सहा महिने पूर्ण झालेल्या गटाला प्रथम कर्ज | मध्यम मुदत | 1.50 लाख पर्यंत | 24 महिने | EMI | 7% | शैक्षणिक फि, दवाखाना, मंगलकार्य तसेच छोटा उदयोग उभारणीसाठी |
प्रथम कज वेळेत परतफेड केलेनंतर व्दितीय कर्ज | मध्यम मुदत | 1.50 लाख ते 3.00 लाख पर्यत | 36 महिने | EMI | 7% | |
दुसरे कर्ज वेळेत परतफेड केलेनंतर तृतीय कर्ज | मध्यम मुदत | 3.00 लाख ते 5.00 लाख पर्यत | 60 महिने | EMI | 10% |
अपंग, वयोवृध्द, वेश्या व्यवसायी महिला, मानवी मैला वाहतुक करणाऱ्या व्यक्ति व तृतीयपंथी यासारख्या विशेष प्रवर्गाच्या बाबतीत किमान 10 ते कमाल 20 ही अट शिथिल केली असून सदर विशेष प्रवर्गाच्या बाबतीत बचतगट स्थापन व कर्जदार करताना हि संख्या 5 (कमाल व्यक्ती) इतकी आहे. दिव्यांग लोकांचे अथवा विशिष्ट श्रेणी मधील व्यक्ती यांचे MSRLM मध्ये महिला व पुरुष यांचा समिश्र गट स्थापन केले जातात.
कर्ज मंजूरी व वाटप :
सहा महिने पुर्ण झालेनंतर गटाच्या अंतर्गत गरजा भागविणे करिता बँकेकडे कर्ज मागणी केली जाते. त्याकरिता बँकेकडून कर्ज मागणीचा विहीत नमुन्यातील अर्ज रु.30/- भरुन घेवून दिला जातो. गटातील सर्व सदस्य यांचे व गटाचे ब वर्ग सभासद फी भरुन घेतली जाते. बँकेच्या विहीत नमुन्यातील फॉर्म भरुन दिल्यानंतर निरिक्षकांकडून छाननी व शिफारस केली जाते. त्यावर विभागीय अधिकारी यांची छाननी व शिफारस होऊन प्रकरण केंद्र कार्यालय महिला विकास कक्ष येथे येते. त्याची छाननी होऊन मा.कार्यकारी समिती कडून मंजूर केले जाते. कर्ज वितरण ज्यात्या शाखेतून गटाकडून सभासदांचे सेव्हिग खातेवर रक्कम जमा दिली जाते. (सर्व सभासदांची 0 बॅलन्सला सेव्हिग्ज खाती कर्ज मागणीचे वेळी उघडून घेतली जातात.) विहीत नमुन्यातील फॉर्म मध्ये पंचायत समिती तालुका समन्वय अधिकारी यांचे गटास कर्ज मंजूरी बाबतचे शिफारस पत्र. तसेच मुल्यांकन फॉर्म सह भरुन दिला जातो.
ग्रामसंघ :
गावात स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता गटांचे संघटन म्हणजे ग्रामसंघ. ग्रामसंघ स्थापन करताना किमान 5 गट व कमाल 25 ते 30 गट असतात.
प्रभागसंघ :
किमान 5 ते 6 ग्रामसंघ एका प्रभागसंघात असतात. ग्रामसंघ व प्रभागसंघाची सेव्हिग खाती बँकेत उघडून घेतली जातात.
अ.नं. | कर्ज मर्यादा (प्रती व्यक्ती) | एकूण | मुदत | हप्ते | व्याजदर | |
1 | प्रथम कर्ज | रु.30000/- | 150000/- | 24 म. | EMI | 14% |
2 | व्दितीय कर्ज | कमाल रु.50000/- | 250000/- | 32 म. | EMI | 14% |
3 | तिसरे कर्ज | कमाल रु.75000/- | 350000/- | 40 म. | EMI | 14% |
4 | चौथे व त्यापुढील कर्ज | कमाल रु.80000/- | 400000/- | 48 म. | EMI | 14% |
5 | कॅश क्रेडिट – प्रकल्प कर्जाच्या 25% | 11 म. | 14% |
बँकेने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) महाराष्ट्र शासन यांचे सी.एम.आर.सी. तसेच कृषी विकास विज्ञान मंडळ बुबनाळ, ता.शिरोळ नाबार्ड NGO यांचे बरोबर JLG स्थापना व कर्जदार वसूली करणेबाबत सामजस्य करार (MOU) केला असून त्याची माहिती खालील प्रमाणे
कार्यक्षेत्र – तालुका हातकणंगले, करवीर पूर्व/ पश्चिम, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ
करार दिनांक – मा.कार्यकारी समिती ठ.नं.70 दि.18/03/2019 ने मंजूर
उदिष्ट – JLG 600 गट रक्कम रु.900.00 लाख
SHG 104 गट रक्कम रु.156.00 लाख
कार्यक्षेत्र – तालुका शिरोळ
करार दिनांक – मा.कार्यकारी समिती सभा ठ.नं.07 दि.07/06/2021 ने मंजूर
उदिष्ट – JLG 400 गट रक्कम रु.600.00 लाख
कार्यक्षेत्र – तालुका कागल व राधानगरी
करार दिनांक – मा.कार्यकारी समिती सभा ठ.नं.63 दि.31/03/2023 ने मंजूर
उदिष्ट – JLG 400 गट रक्कम रु.600.00 लाख
कार्यक्षेत्र – तालुका करवीर (पूर्व) मधील ठराविक शाखामधील संलग्न गावामध्ये
करार दिनांक – मा.कार्यकारी समिती सभा ठ.नं.63 दि.31/03/2023 ने मंजूर
उदिष्ट – JLG 400 गट रक्कम रु.600.00 लाख
कार्यक्षेत्र – तालुका भुदरगड व करवीर मधील ठराविक शाखामधील संलग्न गावामध्ये
करार दिनांक – मा.संचालक मंडळ सभा ठ.नं.17 दि.28/11/2022 ने मंजूर
उदिष्ट – JLG 400 गट रक्कम रु.600.00 लाख
समान आर्थिक स्तरातील व्यवसायिक यांना अल्प व मुदती कर्ज पुरवठा करता यावा याकरिता व्यावसायिक व्यक्तीचा समूह स्थापन करुन त्यांना कर्ज पुरवठा करणे हा संयुक्त देयता समूहांचा (JLG) मुख्य उद्देश आहे. या किरकोळ व्यापारी, स्वंय उदयोजक, लहान उदयोजक, करार क्षेत्रावरील शेतमजूर यांचा समावेश असतो.
निकष :
व्यवसाय चालू असलेबाबतचे खात्री केलेनंतर माविम CMRC व NGO यांचे हमी नुसार
अ.नं. | कर्ज मर्यादा (प्रती व्यक्ती) | एकूण | मुदत | हप्ते | व्याजदर | |
1 | प्रथम कर्ज | रु.30000/- | 150000/- | 24 म. | EMI | 14% |
2 | व्दितीय कर्ज | कमाल रु.50000/- | 250000/- | 32 म. | EMI | 14% |
3 | तिसरे कर्ज | कमाल रु.75000/- | 350000/- | 40 म. | EMI | 14% |
4 | चौथे व त्यापुढील कर्ज | कमाल रु.80000/- | 400000/- | 48 म. | EMI | 14% |
कर्ज मंजूरी व वाटप :
व्यवसाय चालू असलेबाबतचे खात्री केलेनंतर व माविम CMRC व NGO यांचे हमी नुसार JLG करिता बँकेकडून कर्ज मागणीचा विहीत नमुन्यातील अर्ज रु.30/- भरुन घेवून दिला जातो. फक्त समुहास ब वर्ग सभासद फी 100/- भरुन घेतले जाते. बँकेच्या विहीत नमुन्यातील फॉर्म भरुन दिल्यानंतर निरिक्षकांकडून छाननी व शिफारस केली जाते. विहीत नमुन्यातील फॉर्म मध्ये माविम CMRC व NGO यांचे गटास कर्ज मंजूरी बाबतचे शिफारस पत्र. तसेच कर्ज मागणी फॉर्म नं.5 वर माविम CMRC व NGO यांचे सही शिक्का घेणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील फॉर्म पूर्ण भरलेनंतर निरिक्षक यांचे मार्फत छाननी व शिफारस करुन सदर प्रस्ताव विभागीय अधिकारी यांची छाननी व शिफारस होऊन प्रकरण केंद्र कार्यालय महिला विकास कक्ष येथे येते. त्याची छाननी होऊन मा.कार्यकारी समिती कडून मंजूर केले जाते. कर्ज वितरण अटीची पूर्तता केलेनंतर ज्यात्या शाखेतून समूहाकडून सभासदांचे सेव्हिग खातेवर रक्कम जमा दिली जाते.