सदर योजनेअंतर्गत जमिन सुधारणा,शेत जमीन खरेदी,क्षारपड जमिन सुधारणा इ. कारणासाठी कर्ज मंजूर केले जाते.
अ) जमिन विकास
1.
पड,मुरमाड,गवतीपड,क्षारपड,चिगळाट जमिन,पीकाखाली आणणेसाठी सदर जमिन बुलडोझर,जे.सी.बी. ट्रॅक्टर इ.यंत्राव्दारे फोडणे,सपाट करणे,माती / मुरुम ओढणे इ.करिता कर्ज दिले जाईल.
2.
परतफेड क्षमता किंवा कमाल 1.50 लाख हेक्टरी यापैकी कमी रक्कमेस कर्ज मंजूरी दिली जाईल. व्यक्तीगत कर्ज मर्यादा 2.00 लाख राहील.
3.
योजना खर्चाचे कोटेशन सादर करावे लागेल.
4.
जमिन विकास झालेनंतर पीक घेणेसाठी पाण्याची सोय असली पाहिजे किंवा निर्माण केली पाहिजे.
5.
जमिन विकासाचे कामकाज पूर्ण झालेनंतर कर्जाची रक्कम मक्तेदारास अकौंट पेयी चेकने आदा करणेत येईल.